असें म्हणून ही लेखमाला बाजूला ठेवली होती. आतांच पहिल्या भागापासून वाचले. प्रतिसादांसकट. पहिले चार भाग फारच आवडले. मेंदूला मुंग्या आणणारे. संजोप रावांचा 'कल्हईचा' प्रतिसाद लाजबाब आहे.

पहिल्या भागांतली दळणवळणाची दुरवस्था भयाण आहे.

भाग २: आघाण्याच्या देवराईचें वर्णन करतांनाचें सूर्याची किरणं अधूनमधूनच जमिनीचे चुंबन घेण्यापुरतीच खाली उतरायची. हें वाक्य आवडलें.

देवराईतील थंडावा, झाडांचा मंद सुगंध अंगभर भरून घेत. कार्यक्रमातून लक्ष उडायला फारसा वेळ लागलाच नाही. काही क्षणांत देवराईतील वेगवेगळ्या मंजूळ आवाजांनी माझा कब्जा घेतला. सारे पक्ष्यांचे आवाज. कोणता पक्षी वगैरे सांगता येणार नाही. पक्षी दिसायचेही कमीच. कारण झाडोरा अगदी गर्द.

वाचतांना अगदीं थरारून गेलों. मूर्तिमंत रोमांच.

माशा घोंगावर होत्या. शिबिराच्या कार्यक्रमात त्यांचा 'व्यत्यय' नको म्हणून तिथं साखरेचा पाक ठेवण्यात आला होता. वाहवा, काय मस्त युक्ती आहे. डास हाकलायला अशी युक्ती असेल तर!

भाग ३: सापेक्ष वेग, विश्वाचा सातत्यानें होणारा विस्तार. मस्त. बळाचा वापर: भयानक.

भाग ४: काळे आले. मार्मिक टिप्पणी.

भाग ४: वर्षांताला रक्तदानाचें कार्य, हॉस्पिटल ड्यूटी, अंनिसचें कार्य! तेहि राजकारण्यानें केलेलें!!: ग्रेट. तरीहि नोटानोटांमधल्या फरकानें सुन्न झालों. वाचतां वाचतां मला ठायीं ठायीं दोन पुस्तकांची आठवण येत होती. अनिल अवचटांचें हमालांच्या समस्यांवरचें - शीर्षक आठवत नाहीं - आणि दुसरें विश्वास पाटलांचें झाडाझडती.चौथा आणि पांचवा भाग चांगले आहेत पण मला आवडले नाहींत. आपण वेळ निष्कारण दवडतांहांत असें वाटलें. असो, हें केवळ माझें वैयक्तिक मत झालें.

सुधीर कांदळकर