अबीर,
आपण मराठी काव्य किती वाचले आहे मला माहिती नाही. छंदोरचना हे वैशिष्ट्यपूर्ण मात्र क्लिष्ट पुस्तक आहे. तसेच सध्या मिळत नाही. वि. म. कुलकर्णी यांचे पुस्तक मी वाचलेले नाही. मात्र मला असे वाटते की वृत्तांचा फारसा बाऊ करण्यात अर्थ नाही. छंदोरचनामध्ये अतिशय जुन्या प्रकारचे लेखन आहे. त्यात चिकटून राहण्याचे कारण नाही.
इथे जे कवी वृत्तात कविता लिहितात त्यांच्या कविता सुरुवातीला वाचल्यात तरी वृत्त म्हणजे काय हे सहज कळेल. (मी फक्त वृत्त याच विषयावर बोलत आहे.) दीर्घ आणि हृस्व यांचे (म्हणजेच गुरू आणि लघु यांचे) पहिल्या ओळीतील मिश्रण दुसर्या ओळीत आले की झाले वृत्त तयार.
उदाः::
बाप कोणता न माहिती असे मला
माय सोडते कुण्या पथात जन्म हा
बा प को ण ता न मा हि ती अ से म ला
मा य सो ड ते कु ण्या प था त ज न्म हा
कवीला जशी ओळ सुचते तिथेच वृत्त तयार होते. उत्कटता हा कवीचा धर्म असला पाहिजे.
अर्थात वर उल्लेखिलेली पुस्तके वाचायची असल्यास जरूर वाचा. पण कविता करणे सोडू नका इतकेच.
चुभूद्याघ्या.