त्याला एका प्रश्नाचे माझे खरे उत्तर ऐकायचे होते. मी असे प्रश्न विचारण्याचे धाडस का केले होते. "मी पगार देणाऱ्या मालकाचा नोकर नाही. माझ्या कामाचा योग्य मोबदला मिळवणे एवढेच नाते आणि उद्देश. " माझ्या उत्तराचे त्याला कौतुक वाटले होते.

बरे जमते तुम्हाला अशी बाणेदार उत्तरे द्यायला. माझे पाहणे वेगळे आहे. बहुधा वरिष्ठांना त्यांच्याहून किंवा त्यांच्याइतका स्मार्ट कनिष्ठ नको असतो.

तुमची सिरीज चांगली चालू आहे. एकदम ताजे ताजे लेखन.