लेखकाचे नेमके नाव आठवत नाही. परंतु कॅ. जोशी नावाच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सामरिकदृष्टीने लिहिलेले हे पुस्तक मी पूर्वी एकदा वाचले होते. त्यांत दिलेल्या माहितीप्रमाणे अफझलखान हा एका भटारणीचा (स्वयंपाकीण ? ) मुलगा होता. वाईचा नायब सुभेदार (व नंतर सुभेदार पदावर बढती मिळालेला हा आदीलशाही सरदार) प्रारंभीच्या काळात एक दुय्यम दर्जाचा अधिकारी असावा. त्या पुस्तकात असेही वाचले आहे की खानाने विजापूर जवळील 'अफझलपूर' या स्वतःच्या जहागिरीच्या गावी असणाऱ्या आपल्या ३३ बायकांची स्वारीवर निघण्यापूर्वी हत्या केली होती.

शक्य झाल्यास उद्या साहित्य परिषदेच्या ग्रंथालयात जाणार आहे. तेथून या पुस्तकाची पूर्ण माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न करेन.