या मालिकेचे नाव आहे "क्यू कि जीना इसी का नाम है". खेडेगावातील महिला आणि मुलींचे शिक्षण, एडस बद्दल योग्य माहिती, बाल संगोपन इ. गोष्टींवर ही मालिका आहे. कुठेही असे वाटत नाही की आपण माहितीपट बघत आहोत. खूप सुंदर मालिका आहे. पण दूरदर्शन कोणी जास्त बघत नसावे. आमच्याकडे केबल नसल्याने आम्ही ही मालिका आवडीने बघतो. अशा मालिका माहितीपटासारख्या रटाळ होत नाहीत. पात्रांची योग्य निवड आणि प्रत्येकाने समजून केलेले काम यामुळे ही मालिका सुंदर झाली आहे. शिवाय यात एकही वलयांकित चेहेरा नाही. तरीही मालिका उत्तम आहे. जरूर बघा.