gandh chaphyacha येथे हे वाचायला मिळाले:
आमक्या, तमक्याला मत द्या, तेच तुमचा विकास करु शकतात, उठा प्रगतीचा मार्ग धरा.... अशा घोषणा देत एक गाडी येत होती.... घोषणांचा आवाज जसा टिपेला पोहचला तसे त्याने तोंडावरील टॉवेल बाजुला सारला. डोळे उघडले आणि समोरच्या रस्त्याकडे बघितले...... गाडी आली घोषणा देत निघून गेली.... आवाज क्षीण झाला तसे त्याने बाजुला केलेला टॉवेल पुन्हा तोंडावर घेतला आपला डावा हात मानेखाली घालत तो उजव्या कुशीवर वळला... डोळे मिटले आणि पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करु लागला....पण त्याला त्यात यश आले नाही.... त्याने मघाशी आलेल्या गाडीला आणि ज्या नेत्याचा प्रचार ती गाडी करत ...