प्रतापरावांना लढाईत मारण्याची बहादुरी दाखविल्याबद्दल आदीलशाहाने बहलोलखानाला भागानगर जवळील एक गाव बक्षीस दिले होते, त्या वरून हा संदर्भ खरा वाटतो.

आपल्या माहितीबद्दल शंका नाही. पण त्यावेळी भागानगर - गोवळकोंडा परिसरात कुतुबशहाचे राज्य होते असे वाटते.

तो जर खरा असेल तर शिवरायांनी प्रतापरावांना "खानास सला काय निमित्य केला" (तह का केला) असा प्रश्न विचारण्यात दूरदृष्टी दाखविली असे म्हणावे वाटते.

शिवाजीने प्रतापरावाला तसे विचारण्यात दूरदृष्टी होती हे खरेच. पण त्याचे कारण साडेतीनशे वर्षांनंतर निजाम स्वतंत्र राष्ट्र मागेल हे नसावे. शिवाजीराजांचा मुख्य रोख पठाणांविरुद्ध दिसतो. दक्षिणी मुसलमानांना (सिद्दी जौहर वगैरे) तितका विरोध नव्हता, कारण हे पठाण लोक जास्त हिंदुविरोधी असावेत. अफजलखान पठाण होता. कुरूंदकरांच्या मते सर्व हिंदू आणि दक्षिणी मुसलमान यांची एकजूट करून काशीविश्वेश्वराचे मंदिर औरंगजेबाच्या तावडीतून सोडवणे हे शिवाजीराजांचे मुख्य ध्येय होते आणि आणखी काही वर्षे आयुष्य त्यांना लाभते तर त्यांनी ते खरे करूनही दाखवले असते. १६७६ - १६७९ दरम्यान केलेला दक्षिण दिग्विजय ही त्याचीच तयारी होती.

अर्थात काही घटनांची बीजे इतिहासात दिसतात हे खरे आहे. उदाहरणार्थ १७६१ मध्ये झालेल्या पानिपतच्या लढाईत वादाचा एक महत्त्वाचा मुद्दा पेशव्यांच्या राज्याची हद्द कुठवर असावी हा होता. पेशव्याच्या मते ती लाहोरपर्यंत तर अब्दालीच्या मते ती सरिंदेपर्यंत. १९४७ साली फाळणी झाली. लाहोर पाकिस्तानात गेले आणि सरहिंद भारतात राहिले. शेजवलकरांनी अगदी योग्य निरीक्षण नोंदवले आहे की जेथपर्यंत मराठे गेले तिथपर्यंत हिंदूंमधली मुसलमानांची दहशत नाहीशी केली आणि तो भाग भारतात राहिला. जिथे जायचा आळस केला तो पाकिस्तानात गेला. पूर्व पाकिस्तानातले एक निवृत्त हिंदू शिक्षक एक दिवस नागपुरात भोसल्यांच्या वाड्यात आले आणि भोसल्यांच्या वारसाला प्रश्न केला" तुम्ही मराठे लोकांनी पद्मा नदी ओलांडून पूर्वे भागात येण्याचा आळस का केलात? जर आला असतात तर हा भाग भारतात राहिला असता"

त्यामुळ इतिहासातले धडे विसरू नयेत हे अगदी खरे आहे.

विनायक