हे खरे आहे. बिझीनेस हातचे राखून होत नसतो. या हस्तक्षेपाच्या गोष्टी सर्वच घरात होत असतात. त्याला काही इलाज नसतो. किती ऐकायचे आणि काय नाही ऐकायचे हे ज्याचे त्यानेच ठरवावे लागते. आमचा तर बिझीनेस पण नव्हता. तरी हेच प्रकार होत होते. ज्येष्ठांना पण हे कळायला हवे. आपला मुलगा झाला तरी आता तो एक जबाबदार नागरिक आहे. संसारी आहे. हे जर आई-वडिलांनी लक्षात घेतले तर वाद होणार नाहीत. पण हे पिढ्यानपिढ्या चालतच राहणार.