सर्वांत मोठा भाऊ : दादा, अण्णा (कन्नड शब्द), अप्पा (कन्नड तेलुगू शब्द).
दोन नंबरः भाई,
तीन नंबर: भाऊ.
त्यामागील बंधूंना नावांनें वा बाळू, लल्लू इ. लाडक्या नांवानें.

सर्वांत मोठी बहीणः अक्का.
दोन नंबर: ताई.
तीन नंबरःमाई
त्यामागील भगिनींनाः बेबी वा इतर नावांने वा लाडक्या नांवानें.

हें रीतीप्रमाणें झालें पण हा कांहीं हार्ड अँड फास्ट रूल म्हणतां येणार नाहीं.

मला चार काका होते तात्या, नाना, भाऊ आणि माझे ती. पण त्यांना काकांचीं मुलें अण्णा (म्हणून आम्हींदेखील) म्हणत.

तसेंच माझ्या मावशीला पांच मुली होत्या त्यांना माई, बेबी, पपी, आणि शेवटच्या दोघींना नांवावरून सरू आणि हेमा अशीं संबोधनें होतीं.

सुधीर कांदळकर