नावांची पार वाट लावतात.
दादाः दादग्या, दादगो.
मनोहर: मनग्या, मनगो.
कालिदासः कालग्या, कालगो.
महेंद्रः मयगो.
मालतीः मालग्यां
विमलः इमल्यां
लताचा मात्र कांहींही अपभ्रंश करतां आला नाहीं.

आमच्या शेजारची एक बाई पुणें जिल्ह्यतली होती. घरीं गावरान भाषा बोलत. तिचें द्रौपदी असें अवघड नांव तिच्या पतिराजांनीं 'धुरपी' असें सोपें केले आणि तिचा बंधू भास्करचें बाशा. त्यांच्याकडे मोठ्या मुलाला बबन, बबन्या म्हणत आणि गंअम्त म्हणजे सर्वांत धाकट्या मुलाला आबा.

सुधीर कांदळकर