असेल तरच करावा.
१.खाजगीपणाची सीमारेषा तशी अस्पष्ट आणि सापेक्षच आहे. ते परस्परसंबंध किती घनिष्ठ आहेत त्यावर आहे. पूर्वीं मोठ्यांना - मोठा भाऊ, काका, मामा, आत्या, मावशा इ. ना उपदेश करायचा हक्क होता. आतां तसें राहिलेलें नाहीं. आईबापांना देखील तो हक्क बऱ्याच वेळां नसतो. कालाय तस्मै नम:.
२. आणि एखाद्याला न दुखवतां एखादी गोष्ट सुचवणें किंवा उपदेश करणें ही कला आहे. कडू गोळी शुगर कोट करूनच द्यावी लागते. मुख्य म्हणजे उपदेशकर्त्याच्या स्वरांत अहंगंड वा उद्धटपणा, उद्दामपणाचा दर्प डोकावतां नये.
३. तसेंच ज्याला सांगितलें जातें त्याचा शब्दानें वा स्वरानें अवमान होतां नये.
हे तीन ढोबळ नियम पाळले तर सहसा संघर्ष होत नाहीं.
सुधीर कांदळकर