हे मी म्हणत नाही आहे. जून १९६९ मध्ये त्यांचे निर्वाण झाले. त्याला पुण्यातील दै. सकाळने पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली होती. आणि त्या संदर्भातील लेखात त्यांनी हे म्हटले होते.
एखादी गोष्ट माहित नसेल तर त्याचा (सबब ही खोटीस्तुतीवाटते.) असा अपमान करू नये. खुलासा द्या किंवा उदाहरण द्या हे सांगणे योग्यच आहे. मात्र, खोटी स्तुती वगैरे म्हणणे म्हणजे......
सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्व गोष्टींचे खुलासे देऊ शकत नाही. पण काही नावे वगळून किंवा बदलून आणखी माहिती (जी माझ्याकडे भरपूर आहे) देण्याचा प्रयत्न करीन.
सध्या एकच नवीन असे की, "रूरल इंजिनिअरींग" ही संकल्पना दृढ करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. ते स्वतः तर इंजिनिअर होतेच, मात्र त्यांचे वडीलही इंजिनिअरच होते. पुण्यातील एका तालुक्यातील धरणावर इंजिनिअर म्हणून रामचंद्र भागवतांनी काम केले होते.
.... आणि बरं का सुधीर ??
स्वतःच्या घरात (पूर्वीचे २८२ सदाशिव पेठ, सध्याचे ८३५ सदाशिव पेठ, पुणे ३०) सोयी त्यांनी केल्याच नाहीत.
मला खोटे बोलायचे असते तर मी हा उल्लेख केलाच नसता. खात्री वाटत नसेल तर बिनधास्त तपासा.
आणि नातेवाईकांबद्दल म्हणाल तर ही गोष्ट खरीच आहे. आणि मला याची लाज नाही. इतक्या वर्षांत आम्ही नातेवाईकांनी काही न केल्याबद्दलच मला खरे तर लाज वाटते. म्हणूनच कुणीही "खोटी स्तुती" वगैरे म्हणू शकते.
असो पुढील माहिती नंतर....