१. गावसकर या व्यक्तीचा अक्षरशः कंटाळा आल्यानंतर तो निवृत्त झालेला होता. कैकोगणतीवेळा त्याला इम्रान व मार्शलने पाच दिवसाच्या सामन्यात पहिल्या बॉलवर आऊट केलेले आहे. अत्यंत रटाळ खेळणारा माणूस होता. भारतीय लोक व्यक्तीपूजक असल्याने त्याच्या व्यक्तीगत रेकॉर्डसचेच महत्त्व लोकांना जास्त वाटायचे. त्याने ३० धावा केल्या की लोक फटाके आणायला जायचे. जिंकण्याचा कुठलाही तर्कशुद्ध प्रयत्न करता केवळ सामना ड्रॉ करणे हेच त्याचे बहुतांशी वेळा ध्येय असायचे. शेवटी तर अक्षरशः त्याच्यासारखे विक्रम असणारा व 'अनुभव' असणारा माणूस संघात दुसरा नाही म्हणून व लोकांच्या अपेक्षांसाठी त्याला घ्यायचे. वेंगसरकर, चेतन चौहान, विश्वनाथ व कैकवेळा कपिलदेव या लोकांनी गावसकरपेक्षा सरस पद्धतीने धावा
कुटलेल्या आहेत. कपिल, मोहिंदर व वेंगसरकर यांनी कित्येक सामने जिंकून दिले आहेत.

२. रवी शास्त्री हा प्राणी तर आपल्याला लाभलेला एक मोठा शाप होता. कुठल्यातरी 'य' दर्जाच्या सामन्यात सहा सलग षटकार ठोकणे व चँपियन्स चषकात ऑडी मिळवण्यासाठी झटपट क्रिकेटमध्येही कासवासारखे खेळणे ही त्याची कारकीर्द! एकदा जावेदला भर सामन्यात दम देणे हे एक काम त्याने अजून केले म्हणता येईल. अत्यंत कंटाळवाणी फलंदाजी करूनही केवळ 'फेव्हरिट' असल्याने तो कर्णधार झाला.

३. अजहर व जडेजा यातील अजहरची स्वतःच्या पहिल्या तीन सामन्यातील सलग तीन शतके व काही सामने जिंकून देण्यात सिंव्हाचा वाटा असणे हे नक्कीच कर्तृत्व होते. जडेजा असला काय व नसला काय, एकच होता.

४. सचिन 'त्याच्या कारकीर्दीची' पहिली काही ( २ त३  ) वर्षे सोडली तर आजपर्यंत कधीच दबावाखाली खेळलेला नाही. पहिली फलंदाजी असेल तर रावसाहेब शतके ठोकतील, दुसरी फलंदाजी असेल तर काही वेळा शतके / अर्धशतके ठोकतीलही, पण अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात ( आठवा - ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना ) रावसाहेब निवांतपणे बाद होतात. सचिनने जिंकून दिलेले सामने किंवा सामन्याचा मानकरी हे किताब मिळवलेल्या नोंदी पाहिल्या तर अत्यंत सोपी परिस्थिती असतानाच त्याने त्यातील बहुतेक गोष्टी केलेल्या स्पष्ट होतात.

५. गांगुली - भारताला, कपिलनंतर, 'सामना जिंकता येतो' हे शिकवणारा कर्णधार, ऑफसाईडला अत्यंत हुकुमत असणारा फलंदाज, बेदरकार माणूस, दिसायला चिकणा व मिडविकेटला षटकार मारताना अतिशय बघावासा वाटणारा खेळाडू! गांगुली सचिनमुळे किंचित का होईना, झाकोळला गेलाच!

६ - द्रविड - आठवा! लक्ष्मण बरोबर दिडशे धावा करून अडीच दिवस खेळून ईडन गार्डनवर जगज्जेत्यांना अनेक मालिकांच्या विक्रमानंतर पहिल्यांदा धूळ चारणारा माणूस! (लक्ष्मणने केलेल्या २८१ खूप महत्त्वाच्या होत्याच! ) प्रत्येकवेळी 'हिरो सचिन' निराशा करून परतल्यानंतरच्या प्रेक्षकांच्या व इतर काहींच्या मनोधैर्य खचलेल्या परस्थितीत मैदानात यायचे. जवळ जवळ अर्धा तास फक्त सचिन गेल्याचे दुःख घालवण्याचे, डोलार सावरण्याचे काम करायचे. एक एक धाव पळून, तेही पुस्तकातीलच फटके मारून संघाला अशा परिस्थितीत आणायचे की एखादा धोनी, एखादा युवराज ( हे हल्लीचे झाले म्हणा ) एखादा अझर, जडेजा, बेदाडे, पार्थिव, प्रवीण शर्मा संघासाठी भरपूर वेगात धावा करू शकेल.

७ सेहवाग - गाजराची पुंगी! पण वाजली तर कर्णकर्कश्श वाजते. बाकी काही लिहायची आवश्यकता नाही.

८. युवराज - माझ्यामते आत्ताच्या संघातील युवराज हा एकच असा खेळाडू आहे की ज्याच्यावर सचिन, द्रविड, धोनी वगैरे  असल्यामुळे नेमकी 'विजय मिळवून दिलाच पाहिजे' अशी एकांगी जबाबदारी तर पडत नाही पण त्याची ती एकहाती क्षमता मात्र आहे. त्याच्यात जिंकण्याची इच्छाही आहे. ही इच्छा जितकी द्रविडच्या सावधपणात आहे तितकी सचिनच्या अपरिपक्वपणात नाही. आठवा, युवराजने व कैफने जिंकून दिलेली नॅटवेस्ट ट्रॉफी व गांगुलीने फिरवलेला सदरा! युवराजला कर्णधार करू नये अशी प्रार्थना! नाहीतर मग धोनी तुफान खेळायला लागेल हे जरी खरे असले तरी युवराज संपू शकेल.

सचिन, गावसकर यांच्यासारखी माणसे ( गावसकरपेक्षा सचिन खूपच उजवा आहे हे खरे! ) व्यक्तीपूजक समाजासाठी असतात, तर युवराज, कपिल, वेंगसरकर, मोहिंदर, धोनी, गांगुली, हे संघ जिंकावा या इच्छेने खेळताना जास्त दिसतात.

म्हणजेः

१. द्रविडबद्दलची लेखकाची मते पटली नाहीत.
२. कुमार यांच्याशी पूर्ण सहमत!
३. विनायकरावांचे गावसकरबद्दलचे मत पटले नाही.

-सविनय
'बेफिकीर'!