१. अफजलखानाने एकदा चक्क औरंगजेबालाच कैद केले होते. त्यावेळी अफजलखानाचा सेनापती होता मंहमद खान नावाचा एक वृद्ध! औरंगजेबाला जीवाची भीती वाटल्यावर त्याने शत्रूच्या सेनापतीकडून सुटकेची विनंती मंजूर करून घेतली व पळून गेला. अफजलखानाला हे समजल्यावर तो इतका प्रचंड चिडला की दोन्ही हातात दुधारी पट्टे घेऊन तो थेट अदिलशाहच्या दरबारात जाऊन उभा राहिला व हा प्रकार तेथे सांगीतला. महंमदखानाला या गोष्टीसाठी अफजलखानाच्या सूचनेवरून ठार मारण्यात आले.
२. अफजलखानाचा दरारा त्याच्या सहकारी सरदारांमध्येही प्रचंड होता.
३. अफजलखान हा माणूस आकाराने प्रचंड होता.
४. तो स्वतःला 'मूर्तीभंजक' म्हणवून घ्यायचा! तसे स्वतःचेच शिलालेखही त्याने कोरून घेतले होते.
५. त्याने तुळजापुरच्या भवानीची मूर्ती फोडली.
६. तो अत्यंत प्रजाहित पाहणारा सरदार होता.
७. आदिलशहा व बडी बेगम हे स्वतळच अफजलला वचकून असायचे इतका तो शूर, प्रचंड सैन्य असलेला व क्रूर होता.
८. त्याने महाराजांना दगा केला असा उल्लेख वाचलेला आहे. यामुळेच महाराजांनी बिचवे खुपसून त्याची आतडी बाहेर काढली. तो इतका भयानक होता की त्याने स्वतःची आतडी हाताने आत ढकलून ओरडा आरडा सुरू केला. त्याच्या भोयांनी पालखी आणताच तो कसातरी त्याच अवस्थेत पालखीत पडला. संभाजी कावजी नावाच्या माणसाने हे पाहिल्यावर त्याने भोयांचे पायच तलवारीने कापून टाकले. पालखी खाली पडल्यावर त्याने अफजलखानाचे मुंडके कापले, हातात घेतले व महाराजांना दाखवले. मराठ्यांमध्ये असलेला एक एकमेव गुण सहसा इतर स्वरुपाच्या सैनिकांमध्ये पाहायला मिळाला नाही. नेता पडलेला कळले की सगळे सैन्यच पळून जायचे. अफजल मेल्याचे कळण्याच्या आधीच खरे तर मराठ्यांनी हल्ला केलेला होता, पण अफजल मेल्याचे समजल्यावर त्याचे सैन्य अक्षरशः पळून गेले.
९. नेताजी पालकर हा माणूस म्हणजे महाभयंकर राक्षस होता. महाराजांच्या सूचनेप्रमाणे तोफा वाजल्यावर मराठ्यांनी शत्रूवर हल्ला करायचा होता. हा हल्ला करताना अर्थातच, महाराजांच्या अफजल भेटीत नक्की काय झाले हे मराठा सैन्याला लगेच समजणे शक्यच नव्हते. पण महाराजांची काळजी बाजूला सारून नेताजी या माणसाने जो कहर केला त्याची परिणती इतकीच झाली शत्रूची भयानक जीवितहानी झाली. त्यात, अफजल पडला हे कळल्यावर तर उधाणच आले. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी, कुडतोजी हे सगळे जरी आपापल्या जागी प्रचंड शूर असले तरी नेताजीसारखा त्यांच्यापैकी एकहीजण नाही हे मान्य करावेच लागेल.
१०. काही मुसलमान अफजलला ( मुर्तीभंजक, कडवा, शूर असल्यामुळे ) महान मानतात.