आमच्या आजोळी (आईच्या माहेरी) आजोबांची बहिणं म्हणजे माझ्या आईची आत्या राहात असे. ती विधवा होती. आजीला सर्व कामात तिची मोठी मदत होत असे. आम्ही तिला आत्याआजी म्हणत असू. मोठी प्रेमळ होती ती. तिच्या मुलींना {आईच्या आत्येबहिणीना} आम्ही त्यांच्या त्यांच्या नांवापुढे मावशी शब्द लावून हाका मारत असू.