मुग्धाताई,
वरदाची दिवाळी अगदी छान आहे हो. वरदाताई आणि त्यांचे पालक कौतुकास पात्र आहेत.
काढायची शुभरांगोळी।
काढायचे ना रांगोळी असे काहीसे आठ अक्षरी केले तर अधिक छान होईल असे वाटते.
घेउनी भेटाया येती
अष्टाक्षरीत ओळीतील पहिला शब्द दोन किंवा चार अक्षरी असला तर वाचायला अधिक सोपे जाते असे वाटते. येती भेटाया घेउनी असे काहीसे. चू भू द्या घ्या.
वरदाताईंच्या वृत्तबद्धलेखनप्रवासास शुभेच्छा.
आपला
(शुभेच्छुक) प्रवासी