त्या पानावरच्या उजव्या भागातील चौकटीखाली पानाचे क्रमांक दिसतात. (उदा ६३४ मधील ५ ... ) शिवाय निरनिराळ्या आराखड्यातील पाने वाचायची सोय (करण्याची योजना) असावी असे दिसते. मात्र पीटीआयएफएफ व्यतिरिक्त इतर आराखड्यांत ही पाने वाचता आली नाहीत.

पहिली काही पाने काहीच दिसत नाही. कदाचित कोऱ्या पानांचीही छाननी केलेली असावी. तरी चिकाटीने तसेच पुढे गेल्यास सहाव्या पानापासून पुढे वाचता येते. शिवाय पान निवडल्यावर प्रतिमा उमटण्यास अपेक्षेपेक्षा किंचित जास्त वेळ लागतो, त्यामुळे थोडी जास्त वाट पाहावी लागते असे वाटते.

हे पुस्तक ह्या स्वरूपात उपलब्ध झाले ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.