मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:
मी एक कत्तीन आहे. खूप दुःख सोसल्यानंतर मी हे पत्र लिहीत आहे. कृपया या पत्राला आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्धी द्यावी. हे पत्र प्रसिद्ध झालं तर माझी परवड कमी करतील आणि विनंती मान्य करतील अशा लोकांपर्यंत ते पोचेल, असं मी ऐकलं आहे. एका गरीब दुःखी महिलेच्या या पत्राकडे कृपया दुर्लक्ष करू नका. मी एक अभागी महिला आहे. माझ्या दुःखाची कहाणी खूप मोठी आहे. ती मला थोडक्यात सांगितलीच पाहीजे. बावीस वर्षांची असताना मी विधवा झाले. माझ्या पदरात तीन मुली होत्या. मृत्युसमयी माझ्या पतीने काहीही संपत्ती मागे ठेवली नव्हती. वृद्ध सासू, सासरे आणि तीन मुलींना ...