दुवे दोन प्रकाराने प्रतिकृत करता येतात. 
 
१)  कधी कधी आपण पाहत असलेले पानच आपल्याला दुवा म्हणून द्यायचे असते.  अश्या वेळेला आपल्या दर्शकाच्या (browser) वरती पत्याचा डबा असतो (address box) तिथे उजवी टिचकी लावून प्रत करा.
 
 
२) कधी कधी आपल्याला पानावर असलेल्या एखाद्या दुव्यालाच पुन्हा प्रस्तुत करायचे असते.  असे असेल तर वेगळी पद्धती वापरावी लागते.  अश्या वेळी ज्या दुव्याला पुन्हा प्रस्तुत करायचे असेल त्यावर उजवी टिचली लावा व प्रतिकृत करा
 
 
आता ही प्रतिकृत केलेला दुवा आपल्याला मनोगताच्या टंकांतर डब्यात आणायचा आहे. समजा मला खालील प्रमाणे लिहिल्यानंतर दुवा द्यायचा आहे
 
ईथे मी जिथे दुवा हवा तिथे उजवी टिचकी (right click) लावली आणि चिकटवण्याचे शब्दावर टिचकी लावणार.  तसे केल्यावर खालील प्रमाणे दिसेल
 
आता आपल्याला या दुव्याला चांगले शब्दात प्रस्तुत करायचे आहे त्यासाठी वर दिलेल्या HTML फेरफार या रकान्यात टिचकी लावा म्हणजे खालील प्रमाणे दिसेल
 

या डब्यात आपल्याला आता नेमका उपरीनिर्दिशित भाग मुषकाने निवडावा व काढून टाकावा व तिथे नवे लिहावे.
 
नवे लिखाण असे दिसेल आता परत वरच्या बाजुला असलेल्या HTML फेरफार या रकान्यात टिचकी लावुन पुनश्च पहिल्या स्थितित यावे म्हणजे खालील प्रमाणे तुमचे दुवा देण्याचे काम साध्य होईल
 
 
आपलाच
(प्रशिक्षक) तुषार