आपल्या संवेदनाक्षम मनानें छान तपशील टिपले आहेत. पुरुषांच्या डब्यांतही मूकबधिरे मुलगे असतात. शाळेचा गणवेष घालून घोळक्यानें प्रवास करणारे. सर्वसामान्य मुलांप्रमाणें खट्याळ, खोडकर, मस्ती करणारे, ऊर्जेनें ओतप्रोत भरलेले.

माझी बहीण अंधांची शिक्षिका आहे. ती अंध मुलांना नेहमीं हांक मारतांना त्या रीतीप्रमाणें त्यांना बोलावणाऱ्याची दिशा अचूक समजावी म्हणून टाळी पण वाजवते. त्या संवयीनें ती आम्हांला पण हांक मारतांना टाळी वाजवते. मग आम्हीं तिला खूप चिडवतों.

कोशिश सिनेमा पाहिला नाहीं. पण आतां पाहीन.

मोना आवडली.

सुधीर कांदळकर.