माझी सूचना क्र १ ही त्या नाक खुपसणाऱ्या आपण उल्लेख केलेल्या माहेरच्या लोकांसाठीं देखील नव्हे खासकरून त्यांच्यासाठींच आहे.

आणखी एक अपवादात्मक किस्सा सांगतों. आमच्या जवळच्या नात्यांतील एका मुलीला सासरकडचे लोक पैशासाठीं त्रास देत होते. तेव्हां मी तिच्या बंधूंबरोबर त्यांच्या घरीं गेलों. गुंडगिरीची भाषा करून नवऱ्याची कॉलर धरली आणि दम दिला कीं हातपाय तोडून देवळासमोर भीक मागायला बसवीन. नंतर कोर्टांतही निर्दोष सुटून दाखवीन. हवें तर जा पोलिसांत नाहीं तर कितीही गुंड आण. कधीं ना कधीं एकटा भेटशील तेव्हांच हें काम करीन. नंतर तिला त्रास झाला नाहीं. अर्थात हा अपवादात्मक प्रसंग आहे कीं जेव्हां हस्तक्षेप आवश्यक होता.

सुधीर कांदळकर