ए. के. अनगलचे दुनिया में सबसे बडा बोझ ............हे शब्द आठवले.

आधींच अस्वस्थ होतो. माझा एक चाळीसेक वर्षांपासूनचा दादरचा गुजराथी मित्र. शरद देसाई. वय वर्षें ६४. एक डोळा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अयस्वी झाल्यामुळें काढून टाकलेला. मधुमेह विकोपाला गेलेला. म्हणून दुसऱ्या डोळ्याची दृष्टी अधू. त्याची सौ. गेल्या वर्षीं सेवानिवृत्त झाली.  ३२ वर्षांच्या एकुलत्या मुलाचा व्यवसाय ठीक चालत नाहीं म्हणून नाईलाजानें नोकरी करीत असलेला. "सुधीर, फॅक्टरी ऍक्टचे अमुकमुक सेक्शन प्लीज जरा वाचून दाखव. " म्हणून त्याचा दूरध्वनी यायचा आणि मी त्याला त्वरित वाचून दाखवत असे. कारण एकुलत्या एका अधू डोळ्यानें त्याला कांहींही वाचतां येत नाहीं. दोन दिवसांपूर्वीं त्याचा दूरध्वनी आला. चालता फिरता निर्व्यसनी मुलगा अचानक मेंदूतील रक्तस्त्रावानें गेला म्हणून. सुन्न झालों.

त्यामुळें तुमच्या भावना जरा जास्तच प्रकर्षानें जाणवल्या. तुमच्या सर्वांच्या दुःखांत मीं सहभागी आहे.

सुधीर कांदळकर.