तुमची तुम्हीच परिस्थिती अभ्यासा अन मार्ग काढा.

माफ करा, पण हे आपली कौटुंबिक ठिगळे ( जी प्रत्येक कुटुंबात असतातच, माझ्याही आहेत व हे अमान्य करण्यात अर्थ नाही, काही ना काही कमतरता असणारच ) प्रदर्शित करण्याचे किंवा त्यावर न पाहिलेल्या माणसांकडून काहीतरी मतप्रदर्शन करवून घेण्याचे व्यासपीठ असणे विचित्र वाटते.

आपल्या माहितीसाठीः

माझे कुटुंब अगदी आपल्यासारखेच आहे. असाच काहीसा प्रश्न मी व माझी पत्नी सुद्धा चर्चेत घेत असतो. परंतु माझ्या आई वडिलांचे अजूनही कुटुंबातील / घरातील स्वकर्तव्याचे पालन इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे (अर्थातच, त्यामुळे आम्ही दोघेही सुखेनैव नोकऱ्या करू शकत असणार ) की त्यांचे काही सल्ले / मतप्रदर्शन यावर आम्ही काही चिडका प्रतिसाद द्यावा असे व्यक्तिशः मला वाटत नाही, पत्नीला काही प्रमाणात वाटते.

आपल्याला असले प्रश्न जाहीर चर्चिले जावेत असे वाटणे माझ्यादृष्टीने विचित्र आहे.

-बिनधास्त
'बेफिकीर'!
(संपादित : प्रशासक)