गज़ाली.. येथे हे वाचायला मिळाले:

कॉलेजच्या पहिल्या दिवशी रजिस्ट्रेशन ऑफीस बाहेर हिss गर्दी.. बावरलेलं फ़र्स्ट इयर, जरा आत्मविश्वासी सेकंड इयर, निर्ढावलेलं थर्ड इयर आणि बेफ़िकीर फ़ायनल इयर.. सगळी मंडळी उपस्थित होती. एक उंच मुलगी रंग गेलेल्या खांबाला रेलून उभी होती. एवढ्या गर्दीत तिच्याकडेच का चौकशी करायला गेले सांगता नाही येणार, पण मी काही विचारायच्या आधीच तिने सांगितले, की फ़र्स्ट इयरच्या मुलामुलींना उद्या रजिस्ट्रेशन करायला सांगितले आहे. मला वाटतं आमच्या समविचारांची सुरवात तिथेच झाली असावी.

काही दिवसांनी ती वर्गात दिसली. हो म्हणजे दिसलीच! जुजबी बोलण्यापलीकडे ओळख गेली ...
पुढे वाचा. : शिल्पा