आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

चित्रपटाला एक विशिष्ट रचना असणं अपेक्षित असतं. त्याला कथावस्तू असणंही सर्वसाधारणपणे आवश्यक मानलं जातं. पात्रांच्या भूमिकांना आलेख असावेत, त्यांच्या हालचाली कोरिओग्राफ्ड असाव्यात, दिग्दर्शकाने कॅमेरा अँगल्सचा खूप विचार केलेला असावा, या इतर अपेक्षा. या सर्व गोष्टी चित्रपटाच्या दर्जात भर घालतात. तशाच त्याच्या कृत्रिमतेतही. त्याचं सगळं ठरवून केल्याप्रमाणे असणं, हे त्याला वास्तवापासून दूर नेतं. रिचर्ड लिनकलेटरचा स्लॅकर (१९९१) या तथाकथित अपेक्षांना जुमानत नाही.
लिन्कलेटर हा गेल्या काही वर्षांतला अत्यंत महत्त्वाचा दिग्दर्शक आहे. मात्र तो ...
पुढे वाचा. : स्लॅकरः एका पिढीचा साक्षीदार