हे संस्कृत भाषेतील उपसर्ग. त्यांचा प्रयोग खालील अर्थाचा निर्देश करण्यासाठी केला जातो (सं : नालंदा शब्दकोश)
'प्र' : गती, उत्कर्ष, आरंभ, ख्याती, व्यवहार.
'वि' : विशेष, अनेकरूपता, निषेध किंवा विपरीतता.
- हे अर्थ विचारात घेतल्यास मला असे वाटते की, 'ख्याती' (म्हणजे प्रसिद्धी) या पदास 'प्र' उपसर्ग जेव्हा लावला जाईल, तेव्हा नांवलौकिक होण्याची क्रिया चालू असल्याचे म्हणता येईल (गती घेतलेली असेल) आणि 'वि' उपसर्ग जेव्हा लावला जाईल, तेव्हा नांवलौकिक झालेला असल्याचे, त्याची व्याप्ती मोठी असल्याचे  व त्यात वैविध्य असल्याचे दाखविलेले असेल, असे म्हणता येईल. (जसे विश्वविख्यात).