मुक्तांगण येथे हे वाचायला मिळाले:
रेन ट्रीच्या झाडांवर लांबून पाहताना लुकलुकणार्या दिव्यांसारखी दिसणारी तुर्रेदार फुलं ऐटीत झाडांच्या टोकांवर पाणदिव्यांसारखी तरंगत असल्याचा भास होतो....शिरीषाच्या झाडाची एक कमाल वाटते मला, मंद रंगाच्या गुलाबी झुपक्यांनिशी त्याच्या वेंधाळ फांद्या वार्यानिशी हलतात तेव्हा कुठे त्याची फुलं पटकन नजरेत येतात. एरवी आकर्षून घेणारा रंग,पाकळ्या असा अलंकारिक जामानिमा नसला तरी शिरीष फुलांचं असणं निव्वळ आवडतं. साने गुरुजींच्या बालकथांपैकी एका पुस्तकात शिरीषाच्या फुलांचा एक छान संदर्भ होता...तेव्हापासून आजतागायत शिरीषाच्या फुलांचं आकर्षण तस्संच ...