अगदी सहज येथे हे वाचायला मिळाले:

दिवाळी आली की हटकून मला ३-४ वर्षापूर्वीच्या माझ्या पहिल्या दिवाळसणाची आठवण होते. लग्नानंतरची पहिली दिवाळी सासुरवाडीला झाली. सगळेच नवीन - संबंध, माणसे, स्वभाव! अन त्यात आमचा स्वभाव भिडस्त! म्हणून तर ती दिवाळी चांगलीच लक्षात राहिली.

दसरा संपवून ८-१० दिवस झाले की, सासरेबुवा येऊन वत्सलेला माहेरी घेऊन गेले. मलाही आग्रहाचे निमंत्रण होतच. पहिल्या आंघोळीच्या दिवशी सकाळी मी तिथे गेलो. सासुरवाडी अगदीच खेड्यात होती. एस. टी. स्टँडवर उतरून पुढे वस्तीवर जावे लागे. स्टँडवर दोन्ही मेहुणे, सासरे व इतर दोघे तिघे जण होते. मी बॅग घेऊन चालायला ...
पुढे वाचा. : पाहुणचार