झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:
अली माझा कॉम्प्युटर कोर्स मधला मित्र. कॉम्प्युटर कोर्सला मी ऍडमिशन घेतली ती नाईलाजाने, बऱ्याचशा अनिच्छेनेच. त्यात मला कोर्सला जाण्यापूर्वी प्रोग्रॅमिंगच काय साधा कॉम्प्युटर वापरण्याचासुद्धा अनुभव यथातथाच होता. १५ दिवसांच्या अभ्यासाच्या जोरावर मला दिवसभराच्या, तथाकथित ‘competitive’ कोर्सला प्रवेश कसा मिळाला हेच एक नवल होतं. तर वर्गात पहिल्याच दिवशी अलीची ओळख झाली ती ‘the guy with a funny accent’ म्हणून. हळुहळू वर्गात ओळखी वाढल्या, विषयातही थोडीफार रुची निर्माण झाली, आणि नाईलाजाने करायला घेतलेला कोर्स मी एन्जॉय करायला लागले. तरीही ...