असा प्रसंग फार वाईट. अशा प्रसंगातून जाणाऱ्या पालकांची भेट घेण्यासाठीही अमाप धैर्य गोळा करावे लागते. दोन वर्षांपूर्वी एक मित्र सिंहगडावरुन दोर तुटून मृत्यूमुखी पडला होता. अचानक एखाद्या दुखऱ्या रात्री त्याची आठवण येते आणि पोटात खड्डा पडतो.