अगदी 4 वाजता तिखटामिठाचा सांजा वाचला. अनुषंगाने लिंबाच्या लोणच्याचीही आठवण झाली.

तिखट शिरा हे नाव मला आवडले असले तरी त्या नावाने तिखटामिठाच्या सांज्यासारखे तोंडाला पाणी सुटत नाही. अर्थात लोकांना सांजा काय चीज आहे हे सर्वांना कळावे म्हणून तिखट शिरा योजिला असावा.

एक माहिती शिरा या शब्दाचे शीरीं या शब्दाशी नाते आहे. शीरीं (शीरीन नावही असते) म्हणजे गोड. ग़ालिबचा एक शीरीं शेर आहे. -

कितने शीरीं हैं तेरे लब के रकीब
ग़ालियों में भी बेमज़ा न हुआ

चित्तरंजन भट