स्मृति येथे हे वाचायला मिळाले:
दिवाळी जवळ आली की आमच्यात एक प्रकारचा उत्साह संचारायचा. आमच्या घरादाराचे रंगरूप उजळायचे. सर्वात प्रथम म्हणजे घराला रंग. घरामध्ये एक भली मोठी लाकडी मांडणी व दुभत्याचे कपाट होते, लाकडी पाट होते, तेही रंगवले जायचे. मग घरातल्या प्रत्येक वस्तूची साफसफाई. त्यावेळी पितळेचे डबे असायचे ते चिंचेने घासून लखलखीत व्हायचे. फरशी पण धो धो पाण्याने धुतली जायची. ही सर्व घराची प्राथमिक साफसफाई झाली की मग वाण्याची लांबलचक यादी, कारण आई मोठ्या उत्साहाने व आनंदाने लाडू चिवड्यापासून ते अगदी अनारसे कडबोळीपर्यंत सर्व पदार्थ करायची आणि ते सुद्धा ...
पुढे वाचा. : माझ्या आठवणीतली दिवाळी