मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह श्री राममोहन खानापूरकर यांनी हा लेख मला वाचायला पाठवला होता. मला तो आवडला. तो अजूनही कुठल्याही वर्तमान पत्राकडे/ नियतकालिकाकडे पाठवलेला नाही. पाठवल्यावरही प्रत्यक्ष छापला जाई पर्यंत बराच वेळ जातो. म्हणून त्यांच्या अनुज्ञेने मी तो मनोगतवर दिला. (राममोहन मनोगतचे अजून रीतसर नोंदणीकृत सभासद नाहीत. ) उच्च न्यायालयासह महाराष्ट्रातील सर्व न्यायालयांचे कामकाज मराठीतून व्हावे या साठी मराठी अभ्यास केंद्राचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत त्याचा संदर्भ लेखाला आहे.