मीराताई,
खरोखरच तुम्ही फारच सुंदर आणि जीवंत वर्णन उभे केले आहे. जणु काही सर्व घटना, त्यामागील हेतु, त्याबरोबर होणारे संवाद जणु काही समोर चालले आहे असेच वाटते.

मागील कथा ' बोहेमीया मधील कारस्थान' आणि या कथेमधील फरक म्हणजे, त्या कथेत होम्स बोहेमीयाच्या राजाने जे सांगीतले त्याची खातरजमा न करता, सरळसरळ ऍडेलर च्या मागे लागतो, येथे मात्र तो अशी मनोरंजक कथा सांगीतली असतांनाही त्यामागील नेमका हेतु काय आहे याचा सरळ शोध घेतो आणि रक्तवर्णी लोकांच्या संघटनेचा बनाव घडवुन आणणाऱ्या लोकांना पोलीसापर्यंत पोहोचवतो.

काही आवडलेले संवाद.

होम्स > वॅटसन, जेंव्हा मी काही घटना ऐकत असतो तेंव्हा माझ्या स्मृतीकोषातुन अश्या अनेक सहस्त्रावधी घटना आणि कारणे माझ्यासमोर येतात, परन्तु, मी मान्य करतो की ही घटना मी प्रथमच ऐकत आहे.

विल्सन> माझे खरोखरच रक्तवर्णी केस आहेत ते तपासण्यासाठी त्याने माझे केस मुळापासुन उपटण्याचा प्रयत्न केला, साहेब, डोळ्यात पाणी येईपर्यंत तो खेचत होता हो, त्याने माझी क्षमा मागत सांगीतले, की काही काळजी घ्यावीच लागते, आतापर्यंत आम्हाला केसाच्या टोपाने दोनदा आणि रंगाने एकदा फसवले आहे.

वॅटसन > मग काय करणार आहेस तु?
होम्स > काहीही नाही, फक्त धुम्रपान, तीन चिरुटाची समस्या आहे, मात्र तु मध्ये एकही शब्द बोलणार नाहीस हं...

खरी मजा जेंव्हा आपण ही गोष्ट वाचतो ना तेंव्हाच येते. तुम्ही सुध्दा ही कथा वाचा आणि सांगा तुम्हाला काय ते आवडले.

द्वारकानाथ