तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:
अनिश्चितता कुणाला हवी असते? कदाचित ती कुणाच्याच अखत्यारित नसते अन म्हणूनच सगळ्यांच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या स्वरुपात तिचा भाग येत असतो… बर्याचदा शक्यतांच्या वेगवेगळ्या हिंदोळ्यावर येणारी चाहुल गटांगळ्या खात असते… जर सुखाची चमचम चांदणी असेल तर मनाला बागडायला नभाचे रान अपुरे पडते तेच जर एखाद्या अशुभ घटनेची किणकिण असेल तर मात्र एका टिंबात सारे विश्व डोळ्यातल्या पाण्याबरोबर विरघळताना दिसते.. एखादी अत्तराची शिशी पडून फुटल्यानंतर जसे ...
पुढे वाचा. : अनिश्चितता – दैनंदिनी – १५ ऑक्टोबर २००९