सर्वांत प्रथम माफी मागतो ते उशीरा लिहीलेल्या ह्या प्रतिसादाची. शनिवार व रविवार ह्या सुट्टींच्या दिवशी मुलींची बाहेर जायची भूणभूण होती ती पुर्ण करावी लागली व आज कामे साचलेली असतांना आरामात इंटरनेट वर बसणे म्हणजे कामांवर अन्याय्य होतो.  

कपडे व विज्ञान ह्या विषयांत खर तर श्री भोमे साहेबांनीच अर्ध ऊत्तर देऊन टाकलेच आहे. मालकंसाने जरा अतिरेक केलाय व त्याच्या वयाचा विचार करता त्याला दुषणं देऊनही फायदा नाही परंतू श्री भोमे साहेबांनी त्यांचे (स्वतःचे) ऊत्तर पुर्ण करायला काहीच हरकत नव्हती व अत्ता ही नाही. ह्यापुर्वीही कित्येकदा मनोगतींनी आपापसात विचारांची देवाण घेवाण केली आहेच ना ? ह्या पुर्वीही श्री भोमे साहेबांनी श्लोकांचे संदर्भासहीत (वालीची तारा की हरिश्चंद्राची तारा ) स्पष्टीकरण दिले आहेच की.  श्री. भोमे साहेबांना पुर्ण माहीत असणाऱ्या विषयाला मी हात घातला आहे तेव्हा हे सर्व ओघाने येणारच. असो...

ध्वनीस्पंदने व त्याद्वारे उत्पन्न होणारी विद्युतलहरी ह्यांमध्ये संबंध नसता तर एखादे गाणे ऐकतांना किंवा सिनेमातले दृष्य बघतांना आपल्या अंगांवर रोमांच ऊभे राहण्याला काय नाव द्यावे ? एखादी वाईट बातमी ऐकल्यावर शरीराचा थरकाप ऊडणे किंवा अंगावर काटा उभा रहाणे ह्याला काय म्हणावे ? जर तो संबंध मान्य केला मग कीती "व्होल्ट" ची विद्युत निर्मीती झाली ते काय "व्होल्टमिटर" ने तपासणार ? मग त्या विद्युत निर्मीती च्या विशिष्ठ "ऍम्पीयर्स" मुळे 'झटका' बसतो की 'ठीणगी' निघते की त्याचे "ग्राउंडीग" होते हे विषय विद्युत निर्मीती करतांना चावले जावेत. 

शाळेत असतांना मोरपीस कापडावर घासून हाता जवळ नेण्याचा काहीतरी खेळ होता ते सर्वांना आठवत असेलच किंवा टिव्ही बंद असतांना त्याच्या काचे जवळ हात नेल्यासही अंगावरचे केस उभे रहातात ह्याला जर एखादी संज्ञा असेल तर ती संज्ञा वापरून बोलायचे झाले तर जी (स्टॅटीक) इलेक्ट्रीसिटी उत्पन्न होते ती शरीरावरून फिरते व त्यामुळे जे परिणाम होतात ते हृदयाची स्पंदने, मनाची चलबीचल शांत करावयास  उपयोगी होतात. जसे पोवाडा ऐकल्यावर विरश्री उत्पन्न होते त्याच्या बरोबर विरूद्ध परिणाम ह्या लहरी साधतात. मेडीटेशन करीत असतांना ॐ चा हुंकार जसा मनःशांती साठी परिणाम कारक ठरतो तसाच फायदा ठरावीक श्लोक-मंत्र उच्चारांतून होत असतो व त्याबाबत अनेक प्रयोग वेगवेगळ्या स्तरांवरून यशस्वी झालेले आहेत.  

'कुसंस्कारांनी भरलेल्या पोषाखावर' श्री वृकोदरांनी शंका उपस्थीत केली आहे- कुसंस्कार ह्यांचा अर्थ व अगदी सतत बडबड करणारे भटजी ह्यांनी स्वतः केलेला पोषाख ह्यात साधर्म्य आहेच ना ! आपण शरीरावर किंवा मनावर केलेल्या प्रत्येक क्रियेला एक संस्कार ह्या दृष्टीकोनातून पाहील्यास त्यात काही तथ्य असल्याचे दिसेल. मर्तीकावरून आल्यानंतर कुठेही न थांबता सरळ आंघोळ करतोच ना? ह्यांत प्रेताला न शिवलेल्या माणसांचाही समावेश असतो व स्मशानाच्या आत न जाता बाहेरूनच परत फिरणाऱ्यांचाही समावेश असतोच ना? सतत बडबड करणारे भटजी हे स्वतः साठी ते श्लोक-मंत्र ऊच्चारत असतात का? मग त्यांनी कोणताही पोषाख परिधान केला तरी जो पुजेला बसला आहे त्याला काय फरक पडणार? प्रश्न त्यांच्या मंत्रोच्चारांचा व ऐकणाऱ्याच्या भावनेचा आहे. स्पष्ट मंत्रोच्चार जितके महत्वाचे तितकेच ते मन लावून ऐकणे पण महत्वाचेच ! कोणतेही कपडे घालून बसा जर मत्रोच्चारांत लक्ष नसेल व काहीतरी 'वटवट' चालू आहे अश्या भावनेने मंत्रोच्चार ऐकाल तर त्याचा मनावर परिणाम काय होणार?    

जलतरण तलावांमध्ये एका विशिष्ठ कापडा पासून बनवलेला पोषाख वापरण्यासच परवानगी असते ती का? संस्कार म्हणून नव्हे, तर त्या विशीष्ठ (नायलॉन) पोषाखावर पोहल्याने तलावातले पाणी इतर प्रकारच्या (कापडी) पोशाखावरील धूळ व घाणीने खराब होउ नये ही कल्पना असते मग त्याला आपण विज्ञान नाही म्हणायचे तर काय म्हणायचे ? 

फॅक्टरीत काम करतांना घातलेला बॉयलर सुट किंवा लढाईवरच्या सैनिकांचा पोषाख परिधान करून ते जर पुजेला बसले तर आवश्यक ती वातावरण निर्मीती होण्यास व श्लोक-मंत्र व पुजाविधी मध्ये लक्ष लागण्यास त्यांना मदत होउ शकेल का? की त्या पोषाखावर स्वतःची नजर पडल्यानंतर आपली काय कामे बाकी आहेत त्याची त्यांना आठवण येईल? (कुसंस्कार हे पुजा-श्लोक-मंत्र ह्या दृष्टीकोनातून म्हटले गेले आहे ह्याचा अर्थ असा लावला की, बॉयलर सुट किंवा मिलीटरी युनिफॉर्म घालणाऱ्यांवर कुसंस्कारच होतात तर मग मात्र वादच संपला !)

वातावरण निर्मीती प्रत्येक कार्यांत अत्यंत आवश्यक असते ह्यावरही अनेक प्रयोग केले गेले आहेत. सायकॉलॉजीस्ट हे हिप्नॉटीझमचा प्रयोग करतांना जी वातावरण निर्मीती करतात ती वेगळी व बडबडे भटजी-जी काही- पुजेत वातावरण निर्मीती करतात ती वेगळी हे श्री. वृकोदरांचे प्रमेय मात्र समजण्या पलिकडचे आहे. आसन व बैठक हा विषय पुढच्या भागात येईलच. अजून कुणाला काही आधार हवेच असतील तर भारतीय संस्कृती वर अभ्यास करणारे एक प्रोफेसर (श्री.पॅट्रीक ऑलीव्हेल) जे "टेक्सास विद्यापिठात" संस्कृत विषय शिकवतात, त्यांना विचारणे जास्त संयुक्तीक ठरेल कारण काही "प्रोफेसर्स" ना ते सहज शक्य ही आहे व गोऱ्या चामडीच्या माणसाने आपल्या धर्मावर लिहीलेले/सांगीतलेले आपण कौतूकाने व मन लावून ऐकतो.   

"तुमचे सगळे विचार धार्मिक आणि श्रद्धा यानावाखाली मांडत जा. ज्यांना पटतील ते वाचतील बाकीचे सोडून देतील.कोणत्याही आधाराशिवाय 'वैज्ञानिक दृष्टया' वगैरे शब्द वापरू नका."

श्री. वरूण - तुमच्या मोफतच्या सल्ल्या बद्दल मनःपुर्वक आभार पण आपण जगातल्या सर्वोच्च लोकशाही प्रजातंत्र पाळणाऱ्या देशात अहात ह्याचा विसर न व्हावा.

उशिराने दिलेल्या प्रतिसादाबद्दल व व्याकरण "गमभन" ने न तपासतल्या बद्दल परत एकदा माफी मागतो.

 माधव कुळकर्णी.