Sound of Mind येथे हे वाचायला मिळाले:
कुपरटिनोला येऊन दोन दिवस झाले होते आणि मी " अय्या, किती छान, किती वेगळं " या मूडमध्ये असल्याने पानांचे आकार, फ़ुलांचे रंग, माणसं, रहदारीचे नियम, फ़ूटपाथ सगळं सगळं मला म्हणजे देवाच्या बागेत फिरणा-या ईव्ह इतकच नवं नवं होतं.त्यामुळे काही खरेदीसाठी एका मॉलमध्ये शिरताना दारात, शेल्व्हजवर सगळीकडे भोपळेच भोपळे दिसल्यावर मी स्वानंदीला विचारलं, " बाई ग, म्हातारी भोपळ्यात बसून लेकीकडे गेली ही आपली गोष्ट इकडे माहीत आहे का? " सासूने केलेल्या इनोदावर जेवढा प्रतिसाद देता येईल तितका देऊन तिने नम्रपणे सांगितलं, " काकू, आता हॅलोविन आहे ना, त्याची तयारी म्हणून ...