स्वयंसुधारणेच्या रांगेत एक एच्टीएमेल नावाचे बटण आहे, त्यावर टिचकी मारून पाहा. काही जास्तीचे टॅग वगैरे माहिती असेल ती काढून टाका. सहसा चिकटवलेल्या भागाच्या सुरुवातीला असे टॅग येतात. ते काळजीपूर्वक काढावेत नाहीतर लेखाची सगळी सजावट नष्ट होण्याचाही धोका आहे.
लेख लिहिल्यावर दोन शब्दांमध्ये चौकटी येतात. त्यासाठी एच. टी. एम. एल नावाचे बटण दाबल्यावर असे लक्षात आले की, काही ठिकाणी " " हे शब्द आपोआप येत आहेत. हे शब्द काढल्यावर त्या चौकटी जातात. यावर काही उपाय योजता येईल का?