Sound of Mind येथे हे वाचायला मिळाले:
लहानपणी चांदोबात एक लोककथा वाचली होती. एका आदिवासी स्त्रीचा नवरा, मुलगा आणि भाऊ युध्दात मारले जातात. सर्वत्र पडलेल्या शवांच्या गर्दीत तिला आपली माणसं ओळखू येत नाहीत. ती देवाची करुणा भाकते. देव प्रसन्न होऊन तिला वर देतो की, तुला हवा असेल तो नातेवाईक मी जिवंत करून देतो. सगळेच जवळचे असल्याने ती स्त्री विचारात पडते. पण निर्धाराने देवाला सांगते की, माझ्या भावाला जिवंत कर. देव कारण विचारतो , तर ती सांगते, " नवरा परत मिळेल कारण मी परत लग्न करेन. त्यामुळे मला मुलगाही मिळेल. पण भाऊ परत मिळणार नाही." त्या लहान वयात हे विधान धक्कादायक वाटलं. पण आता ...