१९९६ मध्ये मी स्वतः टेली पेकेज मध्ये अकाऊंट चे काम उक्ते केले तेव्हा मि डेटा एंट्री केली पण कोंप्युटर व्यावसायिकाचा घेतला होता तेव्हा त्याने बिल काय बेसिस वर करावेः तुम्ही समजा एक अकाउंटन्ट ठेवला असता तर त्याला तुम्हाला दरमहा एवढा पगार द्यावा लगला असता सबब मि स्वतः डेटा एंट्री करुनही अवाच्या सवा बिल दिले. आज १३ वर्षा नंतर ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्या हि जवळ नाहि.

म्हणुनच फ्री व ओपन सोर्स सोफ्ट्वेअर चा वापर अधिक लोकप्रिय झाला पाहिजे असे माझे वैय्यक्तिक मत आहे. १९८० पासून फ्री सोफ्ट्वेअर फाउंडेशन (एफ. एस. एफ. ) सक्रिय आहे.

म. गांधिना जेव्हा विचारले कि आश्रमातिल खादी काय भावाने विकावी तेव्हा त्यांचे उत्तर असेः " एका ५ सदस्याच्या कुटुंबास आवश्यक असे घरगुती उत्पन्न किति? तसेच एक माणुस दिवसभरात रोज ८-१० तास राबून किती खादी विणू शकेल?" याचे त्रैराशिक मांडून बापुजिनी खादिची किमत ठरविली होति. रा. स्व. संघाचे माजी सरसंघचालक प. पु. रज्जुभैय्या हे नेहमी त्यांच्या प्रत्येक प्रवासात तेथिल स्थानिक बाजारपेठेत जात असत, आणि तेथिल बाजारभाव निट चौकशी करून नोंद करित असत. कारण आपण जेथे आलो तेथिल आपले बांधव काय खातात, काय पहनतात, त्याना साधारण जिवन यापन करण्यास कमित कमी किती उत्पन्न मिळवावे लागते याचा सारासार विचार ते करित असत.