प्रभाकर,

पाककृती हे माझे क्षेत्र नसले तरी अधुनमधुन तुमच्या पाककृती मी आवर्जून वाचत असतो. तुम्ही ह्या गोष्टी अगदी मनापासून करत असतात हे लगेच लक्षात येते.
एक दोन गोष्टी सुचवायच्या होत्या.

१. मनोगतबरोबरच तुमच्या पाककृती एखाद्या वर्तमानपत्रात देत राहा. म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत तुमच्या पाककृती जातील.
२. एखादे पुस्तक बनवण्याचा प्रयत्न करा. लग्नकार्यात आपण इतर भेटी देत असतो त्याचा किती उपयोग होतो हा वेगळा विषय आहे. तुमच्या पाककृतीचे पुस्तक नूतन परिणीतांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
३. तुम्ही पाककृतीचा क्र. आणि वर्गीकरण केले तर अजूनही उत्तम राहील. उदा. नाश्त्याचे पदार्थ, मेजवानीचे, शाकाहारी, बदल म्हणून करायचे इत्यादी इत्यादी.


द्वारकानाथ