असो बुद्धी, असो मेहनत, असो निष्ठा, असो अब्रू
कितीही काय कामाचे अगर विकले न कोणाला

सोप्या शब्दात मांडलेली व्यथा.

मेहनत मधील हकार 'मे' मध्ये मिसळून वापरला तर वृत्तास बाध येत नाही. हिंदी/उर्दू/फारसी/अरबीतील हा हकार अनेक ठिकाणी ही अडचण निर्माण करतो असे वाटते. उदा. चेहरा (नेहमी बोलताना उच्चार च्हेरा असा काहीसा होतो.) नेहमी (बोलताना पुष्कळदा उच्चार काहीसा न्हेमी) तसेच येथे मेहनत (उच्चार काहीसा म्हेनत)! यातले चे, ने, मे हे तितके स्पष्ट आणि सुटे बोलले जात नाहीत असे वाटते. कवितेत मात्र जसे वृत्त असेल त्याप्रमाणे उच्चार करता येतो असे वाटते.