सध्या माहितीच्या माहाजालात विविध विषयाला वाहिलेले बरेचसे मराठी संकेत स्थळ उपलब्ध आहेत. ही सर्व मराठी संकेत स्थळ धुंडाळताना एक गोष्ट जानवली की सध्या उपलब्ध असलेले मराठी संकेत स्थळ सर्व मराठी जनांचा विचार केला तर खुपच कमी आहेत.
प्रत्येकजन सध्या मराठी आणि मराठी भाषेबद्दल बोलताना दिसतात पण मराठी टिकवण्यासाठी, मराठी भाषेतून आधिकाधिक लेखन व्हावे या साठी काही कार्य करताना मात्र कुनीच दिसत नाही. मग मनात विचार आला की इतराप्रमाणे मराठीच्या सध्यःस्थितीबद्दल टाहो फोडण्यापेक्षा का नाही मराठी संकेत स्थळाची निर्मिती करावी.
सर्व मराठीजनाना मराठीतून ऐकमेकासी संवाद साधता यावा, मराठीतून अभिव्यक्त होण्यासाठी एक हक्काच व्यासपीठ उपलब्ध व्हाव हाच हेतू मनात ठेवून हे संकेत स्थळ तयार केल आहे.
या संकेत स्थळावर काही वेगळे विषय हाताळण्याचा प्रयोग करत आहोत. मला खात्री आहे की या कामी तुम्हा सर्व मराठीजनाच सहकार्य लाभेल. मराठी दर्पण हे संकेत स्थळ अधिकधिक लोकप्रिय होण्यासाठी तुमच्या सूचना आणि सल्ल्याचे मनापासून स्वागत आहे.
आधिक माहिती साठी दुवा क्र. २ या संकेत स्थळाला भेट द्या.