या सध्याच्या मंदीला आयटीवाल्यांची चुकीची धोरणेही कारणीभुत आहेत. आपण जी समस्या मांडली ती बरोबरच आहे. आयटी उद्योगाच्या मंदीस खालील कारणे असावीत असे वाटते.

१) या उद्योगाने लोकांना त्यांच्या " अकलेपेक्षा जास्त पगार देण्याची सवय लावली जास्त पगाराप्रमाणे या लोकांना " गुरांसारखे " काम कर्रायला लावले. एकाच माण्साला भरपुर पगार व कामाचे १२ ते १६ तास यामुळे ही माणसे लवकरच निकामी होणार हे कुणाच्याही लक्षात आले नाही. त्याऐवजी कामाचे नियमित तास व योग्य तो पगार हे धोरण ठेवले गेले असते तर "आयटी "    चा लोंढा कमी राहिला असता.

२) " आयटी " म्हणजे "सर्वकाही हा चुकीचा समज सर्वत्र पसरवला गेला.

३) संगणक म्हणजे " देव " असेही चुकीचे समीकरण मांडले गेले.

   आणि आता या परिस्थितीवर " नारायण मुर्ती " काय करणार. त्यांच्या हातात काहीही राहिलेले नाही.

या समस्येवर एकच उत्तर आहे ते म्हणजे या लोकांचे कामाचे तास कमी करून त्यानुसार पगार देणे. की जेणेकरून आहे त्या लोकांचे आयुष्य वाढेल व बेरोजगारांना काम मिळेल.

समाज शास्त्री व मानस शास्त्री यावर काहीही करू शकत नाहीत . कारण त्यांचे सल्ले कोणी मानत नाही.

 " आयटी " उद्योगाने स्वतःच या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे. कारण त्या उद्योगाने स्वतःच्या हाताने स्वतःचे वाटोळे करून घेतले आहे.