दिवाळीची गडबड संपून आजच मनोगत लावले आणि तुमचा लेख वाचनात आला. माझ्या जिवलग मैत्रिणीचा १५ वर्षांचा मुलगा असाच अपघातात गेला. तो त्याच्या वडिलांबरोबर बाईकने १०वीच्या क्लासला जात होता आणि समोरून ट्रक किंवा अशाच एका वाहनाने त्यांना इतकी जबर धडक दिली की वडील बाईकखाली अडकले आणि तरणा ताठा मुलगा डोळ्यांसमोर होत्याचा नव्हता झाला. गॅलरीत उभी राहिलेली आई आत वळते तो पाच मिनिटात तिला ही बातमी. असा प्रसंग वैऱ्यावरही येऊ नये.