मेहनत मधल्या हकाराबद्दल वर मी लिहिले आहे.

तत्त्वज्ञानाचे या शब्दाचे तत्त्वद् - न्यानाचे असे तुकडे केले तर त्त्वद् च्या दोन मात्रा होतात (गागा गागागा ) आणि ही त्रुटी आहे असे वाटते. पण तत्त्व- ज्ञानाचे असे तुकडे केले तर द् चे वजन त्त्व वर न आल्याने त्त्व ची लघ्वक्षराप्रमाणे एकच मात्रा होते. (गाल गागागा ) थोडक्यात सांगायचे तर त्रुटी असली तरी ती येथे उच्चारात किंचित फरक करून दूर करता येते, असे मला वाटते.