कावळा यांचे तिन्ही मुद्दे एकदम मान्य. त्यातला 'अकलेपेक्षा जास्त पगार' हे शब्द वापरल्याबद्दल अभिनंदन. ते शब्द वापरताना माझी बोटे जरा अडखळली. कावळा यांचा आयटी आणि मंदीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न मात्र पटला नाही.. असो तो स्वतंत्र विषय आहे.
आयटी वाल्यांचे कामाचे तास कोण कमी करणार? प्रत्येकाला आपपले शोषण करून घ्यायचे स्वातंत्र्य आहे.
योगप्रभू यांनी मांडलेल्या आयटी वाल्यांच्या कौटुंबिक समस्या ही विचार करण्याजोग्या आहेत.
सर्व परिस्थिती सुधारणे आपल्या हातात नाही. परंतु आपली स्वतःची नक्कीच सुधारता येईल. (आयटीत काम करणार्यांनी किंवा तत्सम, खुप काम खुप पैसा वाल्यांनी विचार करावा).
१) मला काय हवे हे ठरवणेः पैसा हवा हे निश्चित. पण तो कशाच्या मोबदल्यात हे ठरवले पाहीजे. मला कामासाठी साधारणपणे रोजचे ८-९ तासच, आणि आठवड्याचे ५-६ दिवसच देणे जमेल असे ठरवले. त्यापेक्षा अधिक मेहनत न केल्यामुळे प्रगती इतरांपेक्षा कमी होईल त्याचा स्वीकार केला तर बरेचशे प्रश्न कमी होतील.
२) 'मला काय हवे' याचा विचार आपपल्या मुलांना वेळीच करायला शिकवणे (हे मात्र अगदी सर्वांना लागू). आपण फार लहान पणापासून मुलांना स्पर्धा आणि अभ्यासाच्या जोखडास जुंपून त्यांच्या बालपणाचा बट्ट्याबोळ करतो, आणि तारुण्याचा बट्ट्याबोळ करण्याची त्यांना प्रेरणा देतो.
३) आपण असलो नसलो तरी जगरहाटी चालूच रहाणार आहे. त्यामुळे आपले अस्तित्व हे आपल्यालाच जपायचे आहे. जागतिक अर्थव्यवस्था हे एक प्रचंड यंत्र आहे. आणि वरील प्रमाणे पैश्याच्या मागे लागून आपण त्या यंत्राचाच एक निर्जीव भाग बनून रहतो. काम कशाला करायचे? पैसा कमवायला (आणि यंत्र चालवायला). पैसा कशाला कमवायचा? याच यंत्राने बनवलेल्या हजारो निरुपयोगी वस्तू खरेदी करून, पुन्हा यंत्रच चालवायला.
एक उदाहरणः अनेक प्रसंगी आपण काहीना काही भेटवस्तू खरेदी करून कोणाकोणाला भेट देत राहतो. बर्याच वेळा उगाच ही भेट असते. एखादी निरुपयोगीवस्तू आपण कोणालातरीदेतो, तशीच वस्तू तो आपल्याला देतो. दोघेही अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालना देतो. ही निरुपयोगी वस्तू बनवतान कुणीतरी १२-१५ तास काम केलेले असते. आपणही असेच १२-१५ तास कष्ट करून, अश्याच प्रकारची सेवा/वस्तू विकून ती वस्तू खरेदी करण्याची क्षमता मिळवतो. कधिकधी अर्थव्यवस्था याच सर्वाचा मोठा अवतार वाटतो.
असो.
तर आयटी वाल्यांनी, किंवा तत्सम काम करणार्यांनि प्रसंगी तात्कालिक तोटा सहन करून आपल्या मर्यादा ठरवाव्यात.
कदाचित हे सर्व हळुहळू आपोआप होईल. आयटीची पहिली पिढी आत्ताच कुठे म्हातारी होतेय (वयानी).
सप्रेम.