स्मृति येथे हे वाचायला मिळाले:

ऑर्कुटवरच्या माझ्या मित्रमंडळींच्या यादीत एक काका आहेत. मी त्यांना अजिबात ओळखत नाही. त्यांची friend request जेव्हा मला आली तेव्हा common friends बरेच होते म्हणून मी ती स्वीकारली. त्या दिवशी त्यांच्या ऑर्कुट अल्बममध्ये काही छायाचित्रे पाहिली, आणि मी पाहतच राहिले. अय्या! ही तर दिप्ती, आणि ही तिची मुलगी मधुरा! किती गोड दिसत्ये मधुरा! छायाचित्रे मंगळागौरीची होती. लगेच काकांना स्क्रॅप लिहिला की दिप्ती व मधुरा तुमच्या ओन लागतात. त्यांनी त्वरित उत्तर पाठवले की दिप्ती ही त्यांची धाकटी भावजय व मधुरा ही त्यांची पुतणी असे नाते आहे. त्यांच्याकडून लगेच ...
पुढे वाचा. : .......आणि माझे मन भूतकाळात गेले......