ऊर्मी येथे हे वाचायला मिळाले:

काल झी मराठी वर हसा चकटफू चा जुना भाग बघत होते... तो एपिसोड दीवाळी विषेश होता. त्यात एक सेल्समन फराळाच्या वेगवेगळ्या वासांचे परफ्युम्स विकत होता. जरा हटकेच कल्पना. तेव्हाच लक्षात आलं की आपल्या मनात / डोक्यात कितीतरी वास घर करुन असतात. दीवाळी च्या नुसत्या आठवणिनेच आपसुकच नाकाला फराळाच्या पदार्थांचे वास येऊ लागतात. मी लहान असताना आई मला विचारायची 'अगं रवा भाजल्याचा वास आला का गं?' किंवा 'बेसनाचा खमंग वास येतोय ना?' तेव्हा मी असायचे खेळत नाहितर दीवाळीचा होमवर्क पुर्ण करत. आणि आई फक्त मलाच विचारायची असं नाही तर त्यावेळेस घरात जो कोण असेल ...
पुढे वाचा. : वासाचे घर