PrAsI येथे हे वाचायला मिळाले:

कारखानीसांनी दरवाजा उघडला. समर्थांचे नामस्मरण करुन मी आत शिरलो. आत शिरल्या शिरल्याच आपण एखाद्या वेगळ्या जगात प्रवेश केला आहे हे जाणवले. छातीवर कसलेतरी ओझे वाटायला लागले, थोडेसे गुदमरल्या सारखेही वाटत होते. एक विचित्र काहीतरी सडल्यासारखा वास हॉल मध्ये पसरला आणी तयच क्षणी जयराजने हॉल मध्ये प्रवेश केला.
माझी त्याची नजरानजर होताच तो क्षणभर चरकलाच पण मग ह्या वेळेची जणु तो वाटच बघत असल्या सारखा निर्लज्ज हसला. आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेत रोखुन पाहु लागलो. माझी जयराजच्या आत जे काही होते त्याची ओळख पटवण्यासाठी धडपड सुरु झाली, त्याची सुद्धा ...
पुढे वाचा. : अदभुत (अंतीम)